वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

निकाल आला; शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी केव्हा लागणार?

National Merit Cum Means Scholarship (NMMS 2023-24) Exam Result for National Economically Weaker Section Students through Maharashtra State Examination Council. It was announced on 7th February, but it has been a month and a half, yet the state and district selection list of the students who are eligible for the scholarship has not been announced. Maharashtra State Examination Council organized the examination on 24th December 2023 at 730 centers in various districts of the state.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मेरीट कम मिन्स स्कॉलरशीप (एनएमएमएस २०२३- २४) परीक्षेचा निकाल दि. ७ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला मात्र, त्यास दीड महिन्यांचा कालावधी होत आला असून, अद्याप शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची राज्य तसेच जिल्हा निवड यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७३० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते.

राज्यभरातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, अडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती, तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदी मध्ये दुरुस्तीसाठी दि. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट केले होते. मात्र, निकालास दीड महिन्याचा कालावधी झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यादीची वाट पाहत आहेत

About MahaUpdates

Check Also

रयत शिक्षण संस्था अंतर्गत “या’ रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा !!

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025 Rayat Shikshan Sanstha Job Recruitment 2025 – Rayat Shikshan Sanstha …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *