JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पेपर मराठीचा; तपासला इंग्रजी व्याकरणानुसार !!

In the qualifying examination conducted for admission to the Sainik School in the country, many questions of the students of Marathi medium have been wrongly decided as the Marathi papers of the students have been checked according to the grammar rules of the English subjects. As a result, the merits of these students have fallen, making it difficult for them to get admission. The parents have directly appealed to Sainik Board regarding this.

One has to work hard to get admission in Sainik School. However, injustice has been done to the students due to such mistakes by the organization conducting the examination. In this regard, on the initiative of MP Dhananjay Mahadik, these serious mistakes will be reported to the concerned administration Jaising Patil, Kolhapur said

देशातील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे मराठीतील पेपर इंग्रजी विषयांच्या व्याकरण नियमानुसार तपासले गेल्याने या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न चुकीचे ठरविले आहेत. परिणामी, या विद्यार्थ्यांचे मेरिट घसरल्याने त्यांना प्रवेश मिळणे कठीण बनले आहे. याबाबत पालकांनी थेट सैनिक बोर्डाकडे दाद मागितली आहे.

मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांसह विद्यार्थीही हवालदिल झाले आहेत. देशात ३३ सरकारी सैनिक स्कूल असून, यापैकी राज्यात सातारा व चंद्रपूर येथे दोन स्कूल आहेत. प्रवेशासाठी नॅशनल टेस्ट एजन्सीमार्फत (एनटीए) पात्रता परीक्षा घेतली जाते. यंदा जानेवारीत ही परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील तीन केंद्रांवर दोन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय होता. मात्र मराठी भाषेतून पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांचा पेपर इंग्रजी विषयाच्या व्याकरण नियमानुसार तपासला आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या मुलांचे मराठी विषयांच्या सात ते आठ प्रश्नांची उत्तरे चुकीची ठरविली आहेत. परिणामी, या विद्यार्थ्यांचे १४ ते १६ गुण कमी झाले, असा दावा सूत्रांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *