JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या!

54 lakh Maratha Kunbi records have been found in the state. However, the Justice Sandeep Shinde Committee has taken note of the fact that citizens are facing difficulties in getting certificates on this basis. The committee directed all District Collectors to check the records on the website and issue the caste certificate without insisting on certified copies of the application documents for caste certificate.

राज्यात ५४ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र तरीही या आधारावर नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याची दखल न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने घेतली आहे. जात प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अर्जाच्या कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींचा आग्रह न धरता संकेतस्थळावरील नोंदी तपासून जातप्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश समितीकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

मराठा कुणबी नोंदींच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यात येत आहेत. अर्जानुसार प्रमाणपत्रासाठी नोंदीचा ज्या विभागाचा पुरावा आणला जातो, त्याची प्रमाणित प्रत आणण्यास सांगितली जाते. या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच नोंदी आढळलेले पुरावे स्कॅन करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, हे पुरावे नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तलाठ्यांच्या माध्यमातून गावपातळीवर मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश समितीकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *