JOIN Telegram
Tuesday , 8 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचा Time-Table जाहीर!

शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचा Time-Table जाहीर!

10th-12th Board exam Time Table 2024 :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, त्यानुसार बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षा साधारण १० दिवस लवकर सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळावा, या उद्देशाने हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra 10th-12th Exam Time Table 2024

 

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेत होण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेत होणे आवश्यक असते. तसेच अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा मंडळाच्या परीक्षेनंतर होतात. अशा परीक्षांचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल वेळेवर लावावा, अशा विविध गोष्टींचा विचार करून २०२५ मध्ये होणारी दहावीची आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते १० दिवस आधी घेण्याचा विचार करत मंडळाने तारखा जाहीर केल्या आहेत.

शाळा-कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. विषयवार सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तारखांवरील हरकती, सूचना secretary.stateboard@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवण्याबाबतचे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव ओक यांनी केले आहे.

लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा संभाव्य कालावधी-

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि १८ मार्च २०२५
  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा – शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५
  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *