विद्यार्थ्यांना आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड अपडेट नाही केले तर सर्व सुविधा बंद करण्यात येतील. विद्यार्थ्यांची त्यांच्या आधार क्रमांकासाठी जोडलेली बायोमेट्रिक माहिती वयानुसार अद्ययावत करणे गरजेचे असते. परंतु पुष्कळशा विद्यार्थ्यांकडून एकदा आधार क्रमांक मिळाल्यावर हे अद्यवतीकरण राहून जाते. हे टाळण्यासाठी मुलांच्या बायोमेट्रिक अद्यवतीकरणाची मोहीम दोन महिन्यात टप्याटप्याने शाळांमध्ये सुरु करण्याची योजना आखली आहे.
पाच वर्षांचे झाल्यानंतर आधारसाठी बायोमेट्रिक अद्ययावत करणे अनिवार्य असूनही, सात कोटींहून अधिक मुलांनी अद्याप ही प्रक्रिया केलेली नाही. पालकांच्या संमतीने, शाळांमधून मुलांच्या बायोमेट्रिकचे अद्ययावतीकरण सुरू करण्याच्या प्रकल्पावर यूआयडीएआय काम करत आहे. आम्ही सध्या तंत्रज्ञानाची चाचणी करत आहोत.
हे तंत्रज्ञान ४५ ते ६० दिवसांत तयार होईल’, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भुवनेश कुमार यांनी सांगितले. अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरण वेळेवर पूर्ण करणे हे मुलांच्या बायोमेट्रिक डेटाची अचूकता आणि विश्वसनीयता राखण्यासाठी आवश्यक आहे. सध्याच्या नियमांनुसार, सात वर्षांनंतरही हे अद्ययावतीकरण पूर्ण न झाल्यास, आधार क्रमांक निष्क्रिय केला जाऊ शकतो.
जर अद्ययावतीकरण पाच ते सात वर्षांच्या वयोगटात केले गेले, तर ते विनामूल्य आहे; परंतु सात वर्षांनंतर अद्ययावतीकरण केल्यास १०० रुपये शुल्क आकारले जाते अद्ययावत बायोमेट्रिक असलेला आधार क्रमांक शाळा प्रवेश, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी, शिष्यवृत्तीचा लाभ घेणे, डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) योजना आदी सेवांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त आहे.
या अद्ययावतीकरण प्रक्रियेचा विस्तार करून मुलांनी १५ वर्षे पूर्ण केल्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या अद्ययावतीकरणासाठी शाळा आणि महाविद्यालयांमधून ही प्रक्रिया केली जावी, यासाठी प्राधिकरण प्रयत्नशील आहे’, असेही कुमार यांनी सांगितले. पाच वर्षांच्या वयानंतर आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे बंधनकारक असूनही, देशातील सुमारे ७ कोटी मुलांचे अद्याप बायोमेट्रिक अपडेट झालेले नाहीत.
हे लक्षात घेऊन यूआयडीएआयने दोन महिन्यांत शाळांमधूनच टप्प्याटप्प्याने बायोमेट्रिक अद्ययावतीकरण करण्याची योजना आखली आहे. पालकांच्या संमतीने ही प्रक्रिया राबवली जाईल. तंत्रज्ञान चाचणी अंतिम टप्प्यात असून लवकरच हे कार्य सुरू होणार आहे. सात वर्षांनंतर अद्ययावतीकरण न झाल्यास आधार क्रमांक निष्क्रिय होऊ शकतो. यामुळे शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती, परीक्षा नोंदणी यांसारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE