वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IB मध्ये तब्बल ३७१७ पदांची मेगाभरती , पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी ; अर्ज कसा करायचा जाणून घ्या

पदवीधर तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर पदाच्या ३७१७ रिक्त जागेची बंपर भरती सुरु आहे. या भरतीची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया १९ जुलै २०२५ पासून सुरु होणार असून १० ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज करताना उमेदवाराने खाली दिलेली pdf च्या लिंक वर क्लिक करून जाहिरात नीट वाचावी. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांनी www.mha.gov.in या गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज दाखल करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2025 आहे.

IB Recruitment 2025

 भरतीसाठी एकूण रिक्त पदांचा तपशील 

या भरतीद्वारे आयबी एसीआयओ II/कार्यकारी पदांच्या एकूण 3717 पदे भरली जातील. यापैकी 1537 पदे अनारक्षितांसाठी तर 946 पदे ओबीसींसाठी, 442 पदे ईडब्ल्यूएससाठी आणि 566 पदे एससीसाठी,226 पदे एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत.

भरतीसाठी लागणारी पात्रता 

या भरतीत विविध आरक्षित प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, अर्जदाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा किती पाहिजे ?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शासकीय नियमानुसार सूट दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल 7 मध्ये 44,900 ते 1,42,400 पर्यंत पगार दिला जाईल. याशिवाय महागाई भत्ता, प्रवास भत्ता आदी सुविधाही दिल्या जातील.

निवड प्रक्रिया कशी असणार ?

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात MCQ स्वरूपात पेपर असेल, ज्यामध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, रिझनिंग आणि इंग्रजी यांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात Descriptive स्वरूपातील पेपर असेल. त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि अर्जासाठी लागणारे शुल्क किती  ?

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावा लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 650 रुपये आहे, तर अनुसूचित जाती, जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क 550 रुपये आहे. शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाईल.

भरतीसाठी परीक्षा कशी घेतली जाणार ? 

या भरतीसाठी उमेदवारांना टप्प्या टप्प्याने परीक्षा द्यावी लागेल. सर्वप्रथम टियर-1 आणि टियर-2 परीक्षा घेतली जाईल. यानंतर टियर-3 म्हणजेच मुलाखत/ व्यक्तिमत्व चाचणी घेण्यात येईल. सर्व टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे अंतिम यादी तयार करण्यात येईल व यशस्वी उमेदवारांना पदावर नियुक्त करण्यात येईल

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank 9677 Posts Bharti 2026

SBI बँक अंतर्गत ९७६६ क्लर्क पदांची भरती ! SBI Bank 9766 clerk posts Bharti 2026

A golden opportunity to work at SBI! This is a great chance for candidates aspiring …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *