राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास काही तास उरलेले असतानाच शिक्षण संचालनालय विभागाने विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
या यादीत विशेष बाब म्हणजे २०६ विद्यार्थ्यांना ५०० पैकी ५०० गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हरकती नोंदवण्याची संधी
या तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये काही चुका किंवा तक्रारी असल्यास, विद्यार्थ्यांना ७ जून रोजी संपूर्ण दिवसभरात लॉगिनद्वारे शिक्षण संचालनालयाकडे हरकती नोंदवता येणार आहेत.
शिक्षण क्षेत्रात खळबळ
दरम्यान, शिक्षण क्षेत्रात हालचालींना वेग आला असून, आयुक्तांसोबतच्या बैठकीला डावलण्यात आले. त्यानंतर एका संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुणांनुसार विद्यार्थ्यांचे वर्गीकरण
शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे यादी पुढीलप्रमाणे विभागली आहे:
पहिला गट: ४०० ते ५०० गुण मिळवणारे एकूण ३,२२,४४३ विद्यार्थी
दुसरा गट: ३०० ते ३९९ गुण मिळवणारे ५,४१,२६३ विद्यार्थी
तिसरा गट: २०० ते २९९ गुण मिळवणारे ३,०३,०९२ विद्यार्थी
चौथा गट: १७५ ते १९९ गुण मिळवणारे १९,००० विद्यार्थी
याप्रमाणे एकूण ११,८६,६६५ विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati