JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

11वी व १२ वीत मर्यादेपेक्षा अधिक प्रवेश !

११ वी व १२ वीत मर्यादेपेक्षा अधिक प्रवेश !

11th and 12th Admission in Maharashtra 2024 :

८ ते १५ जुलै दरम्यान जिल्ह्यातील अकरावी, बारावी प्रवेश दिलेल्या सर्व महाविद्यालयांची तपासणी केली. प्रवेश क्षमता, प्रत्यक्ष प्रवेश यासह भौतिक सुविधांची पाहणी करून पथकाने अहवाल उपसंचालक कार्यालयाला सादर केला आहे. तपासणीतून ४३४ पैकी ७७ महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेचे निकष पाळले नसल्याचे स्पष्ट झाले.

अकरावी, बारावी अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यातील तब्बल ७७ कनिष्ठ महाविद्यालयांनी मर्यादेपेक्षा अधिक प्रवेश दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील ४३४ महाविद्यालयांची तपासणी केली असता, सुमारे १७ टक्के महाविद्यालयांनी भौतिक सुविधांचे निकष, नियमांकडे दुर्लक्ष करत अधिकचे प्रवेश दिले आहेत. मर्यादेपेक्षा अधिक प्रवेश देण्यात छत्रपती संभाजीनगर शहर, तालुका अग्रेसर आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अशा महाविद्यालयांवर आता कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

शहरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अकरावी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असल्याची चर्चा मागील काही वर्षात होते आहे. शिक्षण विभागाने अकरावी, बारावी प्रवेशाबाबत मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र पाठवित क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देऊ नयेत, असे स्पष्ट केले होते; परंतु यानंतरही महाविद्यालयांनी नियमांना बगल दिल्याचे पथकांच्या तपासणीत समोर आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावी, बारावीचे वर्ग असलेली उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये तपासणीसाठी पथके नियुक्त केली.

८ ते १५ जुलै दरम्यान जिल्ह्यातील अकरावी, बारावी प्रवेश दिलेल्या सर्व महाविद्यालयांची तपासणी केली. प्रवेश क्षमता, प्रत्यक्ष प्रवेश यासह भौतिक सुविधांची पाहणी करून पथकाने अहवाल उपसंचालक कार्यालयाला सादर केला आहे. तपासणीतून ४३४ पैकी ७७ महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेचे निकष पाळले नसल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल राज्य सरकारलाही पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. अकरावीसह अनेक महाविद्यालयांनी बारावीलाही मर्यादेपेक्षा अधिक प्रवेश दिले आहेत. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील असंख्य विद्यार्थी अकरावी पूर्ण झाल्यावर टिसी काढून बारावीला ग्रामीण भागात प्रवेश घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याचे समोर आले आहे.

परीक्षे पुरता प्रवेश; शिक्षणाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष!

विद्यार्थ्यांची मागणी असेल तर क्षमतपेक्षा दहा टक्के अधिक प्रवेश देता येतात. परंतु त्यासाठीही भौतिक सुविधांची उपलब्धता, अर्ज संख्यासह शिक्षण विभागाकडून मान्यता घेणे आवश्यक असते. परंतु ७७ पैकी एकही महाविद्यालयाकडून तसा प्रस्ताव सादर नाही. ७७ मध्ये चार-पाच महाविद्याय वगळता सर्वांनी दहा टक्क्याच्या मर्यादेबाहेरच प्रवेश दिल्याचे सांगण्यात येते.

कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. त्याचा सविस्तर अहवालावर काम सुरु आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिलेली जिल्ह्यात ७७ महाविद्यालये आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुरु केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *