वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अकरावी प्रवेशा च्या दुसऱ्या फेरीची यादी जाहीर !

अकरावी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान दुसऱ्या विशेष फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी आज, मंगळवारी (दि.१९) जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना उद्या, बुधवार (दि.२०) अखेर आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक विभागात अकरावीच्या रिक्त जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर झाली असून, पात्र विद्यार्थ्यांची यादी आज प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २० ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. त्याचबरोबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाची दुसरी फेरी लांबणीवर पडली असून, मार्गदर्शकांना रिक्त जागांची माहिती देण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नाशिक विभागातील ६३ हजार रिक्त जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. नाशिक विभागात अकरावीच्या १ लाख २० हजार २४४ जागांवरील प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. जवळपास अडीच महिन्यांच्या प्रक्रियेनंतरही नाशिक विभागात अकरावीच्या ६३ हजार ५५६ जागा रिक्त आहेत. ‘कॅप’ अंतर्तगत नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ०५५, धुळे जिल्ह्यातील १६ हजार ६३९, जळगाव जिल्ह्यातील ३४ हजार २३४, तर नंदुरबार जिल्ह्यातील १२ हजार ३१६ जागांवरील प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.

11th online admission 2025

चार नियमित व एका विशेष फेरीमध्ये हे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षण संचालनालयातर्फे दुसऱ्या विशेष फेरीसाठी १५ त १७ ऑगस्टदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली होती. या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्येही त्याचा तपशील पाठविला जाणार आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही कळविले जाणार आहे. यासह ‘कट ऑफ लिस्ट’ ही जाहीर होणार आहे.

या यादीतील विद्यार्थ्यांना २० ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेशासाठी अवघी एका दिवसाची मुदत या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संशोधन केंद्रांमधील मार्गदर्शकांकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाला कळविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्गदर्शकांना आता २३ ऑगस्टपर्यंत या जागांची माहिती कळविता येणार आहे. त्यामुळे पीएच.डी. प्रवेशाची दुसरी फेरी लांबणार असून, या फेरीसाठी ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या विविध विभागांमधील आणि पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमधील मान्यताप्राप्त संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांमधील मार्गदर्शकांकडे उपलब्ध असलेल्या जागांची माहिती ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आली होती.

त्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने १४ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे अद्याप ज्या संशोधन केंद्रांनी आणि मार्गदर्शकांनी आपल्याकडे रिक्त असलेल्या पीएच.डी.च्या जागांची माहिती सादर केलेली नाही, अशा प्राध्यापकांना २३ ऑगस्टपर्यंत ही माहिती सादर करता येईल. त्यानंतर पुढील फेरीसाठीची प्रक्रिया राबविली जाईल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

KKWIEE&R नाशिक – शैक्षणिक/शिक्षकेतर पदांसाठी मुलाखतीची सूचना

K. K. Wagh Engineering Recruitment 2025 - K. K. Wagh Education Society, Nashik invites Online applications till last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *