JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पाचवीच्या परीक्षा एप्रिलमध्ये होणार !! प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

The fifth and eighth annual examinations will be conducted in this academic year. All the recognized schools having the syllabus of the state board should conduct the annual examination in the month of April. Zilla Parishad Primary Education Officer Meena Shendkar appealed that all the schools should organize the examination at their level and take due care. The exams will be based on the second semester syllabus. For the annual exams, class V will have First Language, Second Language, Third Language, Mathematics and Area Studies.

For class VIII, the subjects will be first language, second language, third language, mathematics, science and social science. There will be two summative assessments i.e. annual examinations under the Continuous Comprehensive Assessment Scheme. For the exam every school has to prepare the question paper at the school level and conduct the exam. The State Council of Educational Research and Training Maharashtra has made available sample question papers for the fifth and eighth annual examinations, as well as constitution tables, on their website mss.ac.in while schools are developing question papers. Use this to prepare question papers.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांनी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घ्याव्यात. सर्व शाळांनी आपल्या स्तरावर परीक्षेचे आयोजन करावे, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले. परीक्षा द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. वार्षिक परीक्षांसाठी पाचवीला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित व परिसर अभ्यास हे विषय असतील.

इयत्ता आठवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असणार आहेत. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन दोन म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहेत. परीक्षेसाठी प्रत्येक शाळेने शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावयाची आहे. शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या mss.ac.in या संकेतस्थळावर पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका, तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत. याचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार कराव्यात.

पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनःपरीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. पुनःपरीक्षेचे आयोजन देखील शासन आदेशानुसारच संबंधित शाळांनी करावयाचे आहे. दरम्यान, शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषासाठी (एकूण १० माध्यम) तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन एकचे आयोजन करण्यात आले आहे. संकलित मूल्यमापन दोनचे आयोजन २, ३, ४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *