महाराष्ट्र्र राज्य परीक्षा परिषदेने वर्ग पाचवी , आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय माध्यमिक मंडळाची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) एकाच दिवशी येत असल्याने परीक्षा परिषदेने या वेळापत्रकात बदल केला आहे. जाणून घ्या कोणत्या तारखेला घेण्यात येईल परीक्षा .
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

यंदा शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी, (Class 5th, 8th Scholarship Exam) आठवीऐवजी पूर्वीप्रमाणेच चौथी, सातवी या वर्गासाठी घेतली जाणार आहे, तर यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून चौथी, पाचवी, सातवी, आठवी या चारही वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे (Changes in scholarship exam schedule) आल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Examination Council) देण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक (Commissioner Anuradha Oak) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
अर्ज भरण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, आधार नोंदणी क्रमांक असणे अनिवार्य आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्याचा बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही. मात्र, विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र झाल्यास संबंधित विद्यार्थ्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाइन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरता येणार नाही. जिल्हा परिषद, मनपा निधीतून विद्यार्थ्यांचे अर्ज भरणाऱ्या शाळांनी शुल्काची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीला राज्यभरात आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा ‘सीटीईटी’ त्याच दिवशी होणार असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर केले.
पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम भाषा, गणित या विषयांची परीक्षा पहिल्या सत्रात, तर तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची परीक्षा दुसऱ्या सत्रात होणार आहे. प्रथम भाषा, तृतीय भाषा प्रत्येकी ५० गुणांसाठी, तर बुद्धिमत्ता चाचणी, गणित हे विषय प्रत्येकी १०० गुणांसाठी असणार आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह, १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, १६ ते २३ डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह आणि २३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत, ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati