महाराष्ट्रात शाळा मध्ये आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात आधार कार्ड नसल्याने ८ लाख विद्यार्थी धोक्यात आले आहे. त्यांना आता निराधार ठरण्याची भीती आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची तपासणी होणार आहे. २ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ८ लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरण्याची शक्यता आहे. जर आधार कार्ड अवैध ठरलं तर ५ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. शाळांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची वैधता तपासण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून राज्यातील दोन कोटी दोन लाख विद्यार्थ्यांपैकी चार लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, तीन लाख ९५ हजार ८०० विद्यार्थ्यांची आधार कार्ड जमाच नसल्याने वर्गात उपस्थित राहणाऱ्या पण आधार कार्डाविना ‘निराधार’ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आठ लाखांच्या आसपास पोहोचणार आहे. राज्यातील एकूण विद्यार्थीसंख्येपैकी पाच टक्के विद्यार्थी ‘शालाबाह्य’ ठरण्याची शक्यता आहे.

यंदापासून शाळांना सरल पोर्टल (SARAL Portal Maharashtra gov) आणि यूडायस पोर्टल ( UDISE portal Student profile ) या दोन वेगवेगळ्या पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरणे सक्तीचे नाही. त्याऐवजी यूडायस प्लस याच पोर्टलवर ही माहिती भरता येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पटावर नोंद झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार कार्ड वैध असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊनच संचमान्यता करण्यात येणार आहे. त्यानंतर आधार वैध झालेले विद्यार्थी अवैधच ठरणार आहेत.
या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला असून हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा फटका राज्यातील तब्बल आठ लाख शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यात सध्या दोन कोटी दोन लाख तीन हजार २७१ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी चार लाख २३ हजार ४०८ विद्यार्थ्यांची आधार कार्ड अवैध ठरली आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati