8th Pay Commission New Update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. 8व्या वेतन आयोगाच्या चर्चांमध्ये आता एक नवीन वळण समोर आले असून, वेतनवाढ केवळ पद किंवा वरिष्ठतेच्या आधारावर न ठरवता, कर्मचाऱ्याच्या कामगिरीवर आधारित असू शकते.
या नव्या बदलांमुळे काय परिणाम होऊ शकतात आणि मागील वेतन आयोगांनी याबाबत कोणते प्रस्ताव मांडले होते, हे पाहूया. प्राप्त माहितीनुसार, 8व्या वेतन आयोगात परफॉर्मन्स बेस्ड पे स्केल (Performance Related Pay) लागू करण्याचा विचार केला जात आहे. चौथ्या वेतन आयोगाने याबाबत चर्चा केली होती, परंतु प्रत्यक्षात ती अंमलात आणली गेली नाही. आता मात्र या संकल्पनेला ठोस रूप देण्याची शक्यता आहे.
8वा वेतन आयोग केवळ सध्याच्या मूळ पगाराचीच नाही, तर संपूर्ण वेतन पॅकेजाची (बोनस, भत्ते आणि इतर आर्थिक लाभ) तपासणी करणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्याच्या कामगिरीवर विशेष लक्ष देण्यात येईल.
परफॉर्मन्स रिलेटेड पेमेंट (PRP) ही संकल्पना नवीन नाही. चौथ्या वेतन आयोगाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना “व्हेरीएबल इन्क्रीमेंट” देण्याची शिफारस केली होती. पाचव्या वेतन आयोगाने या तत्त्वावर अधिक स्पष्टपणे प्रकाश टाकला.
8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात अशी अपेक्षा आहे की कामाच्या गुणवत्तेवर आधारित वेतनवाढीचा अधिक स्पष्ट फॉर्म्युला तयार केला जाईल. यामुळे केवळ वरिष्ठतेवर आधारित वेतनवाढ थांबेल आणि कामाच्या गुणवत्ते, कामगिरी आणि परिणामकारकतेला अधिक महत्त्व दिलं जाईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE