JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ZP Chandrapur चंद्रपूर जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!

ZP Chandrapur चंद्रपूर जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!

ZP Chandrapur  Recruitment 2024 : चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेत कन्सल्टंट डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट आणि आयटी कन्सल्टंट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ठराविक पदव्या मधील अभ्यासक्रमासोबतच दोन वर्षांचा कामाचा अनुभवास आणि आवश्यक आहे. या पदांसाठी उमेदवाराला दर महिना ७० हजार रुपये इतके वेतन देण्यात येईल.

चंद्रपूर मधील जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांनी काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केले आहे. याच भरतीमधील पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जातील. ही भरती चार रिक्त जागांसाठी आहे. या भरतीतील पदांमध्ये कन्सल्टंट, डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट आणि आय टी कन्सल्टंट या पदांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. साठीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्यासाठी दिनांक २८ जुलै २०२४ ही शेवटची तारीख असेल. उमेदवाराने ठरवून दिलेल्या तारखेच्या नंतर अर्ज जमा केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

Posts Details पदांसाठी उपलब्ध असलेल्या जागा खालीलप्रमाणे:

  • कन्सल्टंट – २ रिक्त जागा
  • डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट – १ रिक्त जागा
  • आय टी कन्सल्टंट – १ रिक्त जागा

Education Details पदानुसार आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता :

कन्सल्टंट -MA, MSW, M.Tech, MBA, M.Sc यापैकी कोणत्याही पदवीचा किंवा पदव्युत्तर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
दोन वर्षांचा काम करण्याचा अनुभव आवश्यक

डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट – MA, MSW,  MBA किंवा मीडिया अँड मास कम्युनिकेशन विषयातील पदवी असणे आवश्यक.
दोन वर्षांचा काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक.

आयटी कन्सल्टंट : आयटी इंजीनियरिंग मधील पदवी असणे आवश्यक. दोन वर्षांचा काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक.

Salary पदांनुसार वेतन :

  • कन्सल्टंट – ७०,०००/- दर महा
  • डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट – ६०,०००/- दर महा
  • आयटी कन्सल्टंट – ६०,०००/- दर महा

ज्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे ती सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जाते येतील कन्सल्टंट डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट आणि आयटी कन्सल्टंट या तीनही पदांसाठी ११ महिन्यांचे नोकरीचे कंत्राट असेल. कर्मचाऱ्यांच्या कामानुसार हे कंत्राट पुढे वाढणार की नाही हे ठरवण्यात येईल. या पदांवर नोकरीवर रुजू झाल्यानंतर चंद्रपूर येथील कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद हे नोकरीचे ठिकाण असेल.

चंद्रपूर जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनासाठी असलेल्या या रिक्त पदांच्या भरतीबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या www.zpchandrapur.co.in या अधिकृत संकेतस्थळाला जरूर भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *