LLB विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.
Law Admission 2024 : राज्याच्या सीईटी कक्षाने कायद्याच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून शुक्रवारपासून कागदपत्रे जमा करणे व पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी १२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडेल.
कायद्याच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ११ जुलैपासून सुरू झाली होती. विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र ही मुदत २४ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त म्हणजेच ६८ हजार १४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार कमी, म्हणजेच ३८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- कागदपत्रे ऑनलाइन जमा व पडताळणी – २६ जुलै
- वर्णमालेतील अक्षरानुसार यादी जाहीर – २८ जुलै
- यादीवर हरकती व तक्रार नोंदणी – २९ ते ३१ जुलै
- पक्की गुणवत्ता यादी- ५ ऑगस्ट
- कॉलेजमधील पसंतीक्रम भरणे – ६ ते ८ ऑगस्ट
- पहिली गुणवत्ता यादी- १२ ऑगस्ट
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

