वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

RRCCR मध्य रेल्वेतील ६२ जागांसाठी भरती, १० वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी !

RRCCR मध्य रेल्वेतील ६२ जागांसाठी भरती, १० वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी !

RRCCR Mumbai Recruitment 2024 :

रेल्वे रिक्रुटमेंट सेल सेंट्रल रेल्वे मुंबई येथे क्रीडा कोटा अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी ६२ जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली  आहे. वय वर्ष १८ ते २५ या वयोगटातील उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात. भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होईल. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल त्याला अर्ज करण्यासाठी दिनांक २१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख निवडून देण्यात आली आहे.

सेंट्रल रेल्वे मुंबईच्या रेल्वे रिक्रुटमेंट सेलने रेल्वे क्रीडा कोटा अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी या गटांमध्ये भरती जाहीर केली आहे. या दोन्ही गटांमध्ये अनेक रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्याचा उद्देश या भरतीत ठेवण्यात आला आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. सदर भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया हे दिनांक २१ जुलैपासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख ठरवून देण्यात आली आहे.

या भरतीत कमीत कमी १८ वर्षे तर जास्तीत जास्त वय वर्ष २५ असलेले तरुण सहभागी होऊ शकतात. ST आणि SC वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत ५ वर्षांची अधिक सूट मिळेल. तर OBC वर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची अधिक सूट देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता- ग्रुप सी आणि ग्रुप डी यामध्ये पदांचे विभागणी केलेली असून या पदांच्या एकूण ६२ जागा रिक्त आहेत. रेल्वे रिक्रुटमेंट सेल सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे या ६२ जागांमध्ये विभागणी केलेली आहे. रिक्त जागांमधली विभागणी आणि त्यानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ.

लेव्हल ५/४ पदे – कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक.

लेव्हल १ पदे – दहावी उत्तीर्ण / आयटीआय/ NAC ग्रांटेड बाय NCVT

लेव्हल ३/२ पदे – बारावी उत्तीर्ण / दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
– सोबतच आयटीआय किंवा अप्रेंटिसशिप असणे आवश्यक.

सेंट्रल रेल्वे मुंबई क्रीडा कोटा अंतर्गत वेयेथे ग्रुप सी किंवा ग्रुप डी यामध्ये असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या उमेदवारांची तीन टप्प्यांमध्ये चाचणी घेण्यात येईल. आधी स्पोर्ट्स ट्रायल किंवा फिजिकल फिटनेस टेस्ट घेऊन त्यातून पुढील फेरीसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्या पुढच्या फेरीत उमेदवारांच्या सर्व सादर केलेल्या कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली जाईल. यात काही चूक आढळल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या फेरीतून पात्र उमेदवार त्यापुढील मेडिकल एक्झामिनेशन या फेरीसाठी निवडले जातील. मेडिकल एक्झामिनेशन ही फेरी पूर्ण केल्यानंतर निवडक उमेदवारांशी पुढे योग्यता पदी नेमणूक करण्यात येईल.

ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये विविध लेव्हल्सच्या असलेल्या या पदांसाठी उमेदवाराची क्रीडा क्षेत्रातील ठराविक पात्रता सुद्धा बघितली जाणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल सेंट्रल रेल्वे मुंबई येथे सुरू असलेल्या इतर घडामोडी आणि भरती संदर्भातील माहिती त्यांच्या https://rrccr.com/ अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.

About Majhi Naukri

Check Also

UMC उल्हासनगर NUHM/15th FC/HBT/PC अंतर्गत ८२ वैदयकीय पदभरती जाहीर

UMC NUHM/15th FC/HBT/PC Recruitment 2025 - Deputy Commissioner (Medical Health Department), Ulhasnagar Municipal....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *