पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव निवडीचा वाद पेटणार !
Pune University Registrar Selection :
कुलसचिव नियुक्तीबाबत लेखी तक्रार देणाऱ्या विविध संस्था आणि संघटनेच्या प्रतिनिधींना मंगळवारी विद्यापीठात बोलवले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादावर तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने समितीची स्थापना केली आहे. या समितीकडून मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी बारा वाजता तक्रारदारांना समितीसमोर आपले म्हणणे सादर करण्याची संधी दिली आहे. कुलसचिव नियुक्तीबाबत लेखी तक्रार देणाऱ्या विविध संस्था आणि संघटनेच्या प्रतिनिधींना मंगळवारी विद्यापीठात बोलवले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाच्या मुलाखती सुमारे पंधरा दिवसांपूर्वी झल्या. मात्र मुलाखतीच्या दिवसापासूनच विविध व्यक्ती, संस्था व संघटनांनी कुलसचिव पदासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या संभाव्य व्यक्तीच्या विरोधात लेखी तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारीमध्ये काही गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले असून, त्याला काही पुरावे जोडण्यात आले आहे. त्यावर विद्यापीठाने विधी विभागाचा सल्ला घेतला. विधी विभागाच्या सल्ल्यानुसार आता एका समितीच्या माध्यमातून या सर्व तक्रारीबाबत सुनावणी घेतली जाणार आहे. पुणे विद्यापीठाचे माजी आधिसभा सदस्य यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी यांनी विद्यापीठाकडे संभाव्य कुलसचिव पदाच्या उमेदवाराबाबत आक्षेप घेत लेखी निवेदने दिली होती. या सर्व निवेदनांवर समितीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या तक्रारीवर जाणून घेतल्या जाणार आहेत. याबाबतचे ई-मेल संबंधितांना पाठविण्यात आले आहे. या तक्रारींवर अंतिम निर्णय झाल्यानंतर कुलसचिव नियुक्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
उच्च शिक्षण संचालकांनी तत्काळ लक्ष घालावे-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवड समितीने कुलसचिव पदासाठी निवड केलेली तीन नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. आरोपांच्या पिंजऱ्यात अडलेली व्यक्तीच्या व्यतिरिक्त आणखी दोन नावे कोणती, याबाबत कोणतीही माहिती नाही. मुलाखत प्रक्रिया होऊन पंधरा दिवसानंतरही कुलसचिवांची निवड होत नाही. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची भेट घेऊन, त्यांना कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने विद्यापीठाला आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे.
पुणे विद्यापीठाने जबाबदारी तक्रारदारांवर ढकलली-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अजून कुलसचिवांची निवड करून, ती जाहीर केलेली नाही. अशावेळी संबंधित व्यक्तीची पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने नेमलेल्या समितीच्या वतीने चौकशी करण्याऐवजी, ती जबाबदारी तक्रारदाकांवर ढकलून पुणे विद्यापीठाला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati