वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ORN मधील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूनंतर दिल्ली सरकार ‘कोचिंग क्लास’बाबत करणार कायदा !

ORN मधील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूनंतर दिल्ली सरकार ‘कोचिंग क्लास’बाबत करणार कायदा !

Delhi Rau’s IAS Study Circle flooding News : राजेंद्रनगरातील संबंधित ‘राव आयएएस स्टडी सर्कल’ या सेंटरच्या तळघराच्या बेकायदा वापराची माहिती कोणत्या अधिकाऱ्याकडे होती, हेही तपासात समोर येईल. दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू (Shreya Yadav, Tanya Soni, Navin Dalwin) झाल्याच्या दुर्घटनेला तीन दिवस उलटल्यावर दिल्ली सरकारला जाग आली असून, आता राज्य सरकार कोचिंग सेंटरना अधिकृत परवानगी घेणे सक्तीचे करण्याचा कायदा आणणार आहे.
‘दिल्ली सरकार आता कोचिंग सेंटर नियमित करण्याबाबत कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करणार आहे. त्यात सरकारी अधिकारी आणि विविध कोचिंग सेंटरमधील उमेदवारांचा समावेश असेल. कोचिंग सेटरबाबतचा कायदा, तेथील पायाभूत सुविधा, शिक्षकांची पात्रता, शुल्क नियमन आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा प्रसार करण्यास मनाई करण्याच्या तरतुदी प्रस्तावित कायद्यात असतील,’ असे दिल्लीच्या मंत्री आतिषी यांनी बुधवारी सांगितले.

राजेंद्रनगरातील संबंधित ‘राव आयएएस स्टडी सर्कल’ (Rau IAS Study Centre in Old Rajinder Nagar) या सेंटरच्या तळघराच्या बेकायदा वापराची माहिती कोणत्या अधिकाऱ्याकडे होती, हेही तपासात समोर येईल. हे तळघर धोकादायक असल्याबाबत काही विद्यार्थ्यांनी एमसीडीकडे केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. तसे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
२०० क्लासना नोटिसा-
दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) कायद्याचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये किंवा स्टडी रुमसाठी तळघरांचा बेकायदा वापर करणाऱ्या अनेक कोचिंग सेंटर्सवर कारवाई केली आहे. राजेंद्र नगर, मुखर्जी नगर आणि प्रीत विहारमधील ३० कोचिंग सेंटरची तळघरे सील करण्यात आली आहेत. जुन्या राजेंद्रनगरमधील किमान २०० कोचिंग सेंटरना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असेही आतिशी यांनी सांगितले.

About Majhi Naukri

Check Also

UMC उल्हासनगर NUHM/15th FC/HBT/PC अंतर्गत ८२ वैदयकीय पदभरती जाहीर

UMC NUHM/15th FC/HBT/PC Recruitment 2025 - Deputy Commissioner (Medical Health Department), Ulhasnagar Municipal....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *