JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UGC NET 2024 परीक्षेला सुरुवात; NTA ने केले जाहीर !

UGC NET 2024 परीक्षेला सुरुवात; NTA ने केले जाहीर !

UGC NET 2024 :

युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट २०२४ (UGC NET EXAM 2024) देऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यंना NTA च्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. NTA ने UGC NET EXAM 2024 ची दिनांक जारी केली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने UGC NET EXAM 2024 ची दिनांक जारी केली आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट २०२४ (UGC NET EXAM 2024) देऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यंना NTA च्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. या आधी UGC NET EXAM 2024 चे आयोजन १८ जून २०२४ रोजी करण्यात आले होते. परंतु पेपर लीक होण्याच्या शंकेमुळे परीक्षेस रद्द केले गेले होते. १८ जून रोजी UGC NET EXAM 2024 देशभरातील एकूण ३१७ शहरात १२०५ केंद्रांवर आयोजित केले गेले होते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केले होते. ११.२१ लाखांच्या अर्जधारकांच्या संख्येतील ८१% उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित राहिले होते.

दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी UGC NET EXAM साठी उपस्थित राहतात. भारतातील विविध विद्यापीठांमध्ये प्रोफेसरचे पद मिळवण्यासाठी अनके विद्यार्थी UGC NET EXAM परीक्षेची तयारी करतात. विशेष म्हणजे या वर्षीपासून पीएचडीचे शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंट्रान्स टेस्ट म्हणून UGC NET EXAM स्वीकारली जाईल. वर्षांतून दोनदा या परीक्षेचे आयोजन केले जाते, संबंधित क्षेत्रात करिअर बनवू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी UGC NET EXAM उत्तम संधी प्रदान करते.

UGC NET EXAM २०२४, २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरच्या दरम्यान दोन शिफ्ट्समध्ये आयोजित केले जाईल. पहिल्या शिफ्टचा कालावधी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत असेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे म्हणणे आहे कि एक्साम सिटीची संपूर्ण माहिती परीक्षेच्या १० दिवसांअगोदर पुरवण्यात येईल. वेळापत्रकानुसार, २१ ऑगस्टला इंग्रजीचा पेपर होईल, तर २६ ऑगस्टला हिंदीचा पेपर होईल. २९ ऑगस्टला इतिहास तर ३ सप्टेंबरला कॉमर्स आणि ४ सप्टेंबरला पोलिटिकल सायन्सची परीक्षा घेण्यात येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *