JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NaBFID मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती!

NaBFID मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती!

NaBFID Mumbai Recruitment 2024 :

नॅशनल बँक फॉर फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट म्हणजेच NaBFID अंतर्गत 18 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत वय वर्ष ५५ हुन कमी वयाचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठी २५ ऑगस्ट २०२४ शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे. त्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

NaBFID म्हणजेच नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटतर्फे रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ह्या भरतीतून १८ रिक्त जागा भरल्या जातील. या अठरा जागा उपाध्यक्ष पदाच्या आहेत.

NaBFID Recruitment 2024

पदांची नावे आणि रिक्त जागा :

उपाध्यक्ष (L&PF) – ५ जागा

उपाध्यक्ष (क्रेडिट रिस्ट अँड पॉलिसी) – ३ जागा

उपाध्यक्ष (स्ट्रॅटेजी एक डेव्हलपमेंट अँड पार्टनरशिप) – ३ जागा

उपाध्यक्ष रिस्क मॅनेजमेंट (इंडस्ट्री रिसर्च) – १ जागा

उपाध्यक्ष रिस्क मॅनेजमेंट (ऑपरेशनल रिस्क) – १ जागा

उपाध्यक्ष (ट्रेजरी) – १ जागा

उपाध्यक्ष (अकाउंट्स) – १ जागा

उपाध्यक्ष (कम्प्लायन्स) – १ जागा

उपाध्यक्ष (इंटरनल ऑडिट) – १ जागा

उपाध्यक्ष (आयटी) – १ जागा

कोणत्याही पदासाठी वय वर्ष ५५ ही वयोमर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे ५५ वर्षाहून कमी वय असलेले उमेदवारच या भरतीत सहभागी होऊ शकतात. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेल करून सादर करायचे आहेत. हे अर्ज करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे २५ ऑगस्ट २०२४ नंतर जमा झालेले अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता :
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये सुरू असलेल्या या भरतीत कोणत्याही पदावर रुजू होण्यासाठी उमेदवाराचे पदवीपर्यंतचे शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे पदव्युत्तर शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्या त्या पदांनुसार उमेदवाराने जर सीए किंवा एमबीए हे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले असतील तर ते देखील या भरतीत सहभागी होऊ शकतात. उपाध्यक्षपदी नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना तत्सम कामातील किमान बारा वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, त्यांना असलेला कामाचा अनुभव इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन त्यांचे मासिक वेतन ठरवण्यात येईल. तसेच या भरतीतून होणारी नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीची असेल. हे कंत्राट कमीत कमी तीन वर्षे ते जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी असेल.

या संदर्भातील अधिक माहिती नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट यांच्या https://nabfid.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वाचता येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *