JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IWAI मध्ये नोकरीची उत्तमसंधी ; अनेक पदांसाठी करता येईल अर्ज !

IWAI मध्ये नोकरीची उत्तमसंधी ; अनेक पदांसाठी करता येईल अर्ज !

IWAI Bharti 2024 : IWAI ने अनेक पदांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी आणली आहे. भरती प्रक्रियेला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना ‘या’ लिंकवरून अर्ज करता येणार आहे.

इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IWAI) ने अनेक पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत IWAI मधील अनेक पदांचा विचार केला जाणारा आहे. ऑगस्टच्या १६ तारखेपासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत. महत्वाची बाब म्हणजे अशी बहुतेक उमेदवार आहेत जे या भरती प्रकियेत सहभाग घेण्यासाठी उत्सुक आहेत पण अद्याप अर्ज केले नाही आहे. जर तुम्ही देखील IWAI च्या रिक्त पदांच्या निवड प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिता तर २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी IWAI च्या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी.

IWAI Recruitment 2024

इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IWAI) भारत सरकारच्या जलमार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणात कार्य करते. नुकतेच या संस्थेने अंतर्गत असलेल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. यामध्ये MTS म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या ११ रिक्त जागा, जूनियर अकाउंट ऑफिसरच्या ५ जागा, असिस्टेंट हाइड्रोग्राफिक सर्वेयर (AHS) पदासाठी १ जागा, इंजिन ड्रायव्हर पदासाठी ०१ रिक्त जागा, ड्रेज कंट्रोल ऑपरेटर पदाच्या ५ जागा, स्टोअर कीपर पदाची १ जागा, मास्टर सेकंड क्लास पदाच्या ३ तर स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या ३ रिक्त जागांचा समावेश आहे. त्याचबरोबर मास्टर थर्ड क्लास साठी 1, तांत्रिक सहाय्यक पदासाठी ४ तसेच सहाय्यक संचालक पदासाठी २ जागा रिकाम्या आहेत.

IWAI च्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराची १०वीं/ग्रेजुएट/बीई/बीटेक संबंधित शिक्षण उत्तीर्ण असावा. २५ वर्षे ते ३५ वर्षांपर्यंत आयु असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदांसाठी मिळणारे दरमाह वेतन उमेदवाराच्या पदावर अवलंबून आहे. तरी १९,९०० ते १,७७,५०० रुपयांपर्यंत दरमाह वेतन मिळेल अशी शक्यता आहे. अर्ज करताना उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे जर उमेदवार सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातून असेल तर त्यांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. अर्ज शुल्काची रक्कम एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये इतकी आहे. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवाराबन्नी IWAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

Post expires at 5:23pm on Saturday September 21st, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *