‘चार लाख विद्यार्थ्यांना जर्मनीत पाठविणार’
4 lakh students will be sent to Germany : ‘देशातील युवकांना परदेशात नोकरीसाठी पाठविताना काही वेळा संस्थांमार्फत त्यांची फसवणूक होत होती. मानवी तस्करीचाही प्रश्न निर्माण होत होता. मात्र, आता सरकारने जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार करून पुढाकार घेतल्याने युवकांमध्ये विश्वास निर्माण होणार आहे. परदेशातील महिलांकडून महिला गाइडची मागणी होत असून, या संधीचा लाभ घेऊन महिलांनी परदेशी भाषा शिकून गाइड होण्याची संधी मिळवावी. लंडन, चीन, युरोप आदींमध्ये भारतीय खाद्यपदार्थांविषयी उत्सुकता आहे. योग, आयुर्वेदाचीही मागणी आहे. त्यामुळे अनेक देशांना समोर ठेऊन कौशल्य विकासाचे काम करावे लागेल,’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुचविले.

‘राज्य सरकारने जर्मनीमधील बाडेन वुटेनबर्ग राज्याशी करार करून ३१ कौशल्यांशी संबंधित मनुष्यबळ पुरविण्याबाबत तयारी केली आहे. त्यानुसार येत्या दीड वर्षात चार लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. यासाठी निवड झालेल्या युवकांना कौशल्यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोएथे संस्थेमार्फत इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षित करून, त्यांच्यामार्फत युवकांना जर्मन भाषेचे ज्ञान देण्यात येणार आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) व नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्या वतीने सरकारी दूरशिक्षण तंत्रनिकेतनात उभारण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘डीटीई’चे संचालक डॉ. विनोद मोहितकर, ‘एमएसबीटीई’चे संचालक डॉ. प्रमोद नाईक, ‘एनएसडीसी प्रबोधिनी’चे उपाध्यक्ष नितीन कपूर, ‘एनएसडीसी’चे सल्लागार मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपसिंग कौरा आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय संधींच्या दृष्टीने हे पुण्यात स्थापन झालेले कौशल्य विकास केंद्र महत्त्वाचे पाऊल आहे. भारत सर्वाधिक तरुणांचा देश असून, आपल्या देशाने आपल्या कामाच्या माध्यमातून जगाची सेवा केली पाहिजे. त्यासाठी तेथील मागणीच्या अनुषंगाने कौशल्ये घेऊन तेथे सेवा बजावण्यासाठी जाणे गरजेचे आहे. आपल्याला राज्याची संस्कृती, आपली आदरातिथ्याची संस्कृती परदेशात पोहोचविण्याची ही चांगली संधी आहे.
पाटील म्हणाले, ‘युरोपसह अनेक देशांत कौशल्याधारित काम करणाऱ्या मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता असून, येथील युवकांना परदेशात नोकऱ्या, रोजगार देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळेही येथील युवकांना परदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.’ या वेळी डॉ. मोहितकर यांनी प्रास्ताविक केले. ‘एनएसडीसी’चे नितीन कपूर यांनीही मनोगत व्यक्त केले.
”एनएसडीसी’चे अनेक देशांशी करार झाले असून, येथील कौशल्यप्राप्त युवकांना परदेशात पाठविण्यासाठी ‘एनएसडीसी’मार्फत सर्व सहकार्य केले जाते,’ असे संदीप सिंग कौरा यांनी सांगितले.
‘परदेशी भाषा शिकून गाइड होण्याची संधी’
‘देशातील युवकांना परदेशात नोकरीसाठी पाठविताना काही वेळा संस्थांमार्फत त्यांची फसवणूक होत होती. मानवी तस्करीचाही प्रश्न निर्माण होत होता. मात्र, आता सरकारने जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार करून पुढाकार घेतल्याने युवकांमध्ये विश्वास निर्माण होणार आहे. परदेशातील महिलांकडून महिला गाइडची मागणी होत असून, या संधीचा लाभ घेऊन महिलांनी परदेशी भाषा शिकून गाइड होण्याची संधी मिळवावी. लंडन, चीन, युरोप आदींमध्ये भारतीय खाद्यपदार्थांविषयी उत्सुकता आहे. योग, आयुर्वेदाचीही मागणी आहे. त्यामुळे अनेक देशांना समोर ठेऊन कौशल्य विकासाचे काम करावे लागेल,’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुचविले.
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati