NEET Exam चा पेपर लिक देशात १४४ जणांकडून ‘नीट’ पेपरची ‘खरेदी’, आतापर्यंत ४९ जण अटकेत !
NEET paper leak 2024 : नीट पेपरफुटी प्रकरणी २९८ साक्षीदार, २९० कागदपत्रे आणि ४५ वस्तू तपासून सीबीआयने तब्बल साडेपाच हजार पानांचे हे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पेपर कसे फोडले, याची सविस्तर माहिती दिली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जमशेदपूर येथील २०१७च्या तुकडीचा सिव्हील इंजिनीअर असलेल्या कुमार याला प्रश्नपत्रिकांच्या पेट्या ठेवलेल्या कक्षात प्रवेश करण्याची परवानगी हक आणि आलम यांनी दिल्याचे यात म्हटले आहे
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा फुटलेला पेपर १४४ उमेदवारांनी विकत घेऊन परीक्षेच्या काही तास आधी सोडवला होता. या उमेदवारांची ओळख सीबीआयने पटवली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
नीट पेपरफुटीप्रकरणी तिसरे आरोपपत्र सीबीआयने गेल्या आठवड्यात दाखल केले. पंकज कुमार या सूत्रधाराने झारखंडमधील हजारीबाग येथील ओअॅसिस शाळेतून मुख्याध्यापक अहसानुल हक आणि उपमुख्याध्यापक महंमद इम्तियाझ आलम यांच्याशी संगनमत करून प्रश्नपत्रिका चोरली, असे या आरोपपत्रात म्हटल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
परीक्षेच्या दिवशी पाच मे रोजी सकाळी आठनंतर बँकेच्या सुरक्षित विभागातून प्रश्नपत्रिकांची पेटी शाळेत पोहोचल्यानंतर हा गुन्हा घडल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय चाचणी संस्थेने नीट-यूजी परीक्षेच्या आयोजनासाठी हक यांना हजारीबागसाठी शहर समन्वयक म्हणून नेमले होते, तर आलम हे परीक्षा केंद्राचे अधीक्षक होते.
नीट पेपरफुटी प्रकरणी २९८ साक्षीदार, २९० कागदपत्रे आणि ४५ वस्तू तपासून सीबीआयने तब्बल साडेपाच हजार पानांचे हे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पेपर कसे फोडले, याची सविस्तर माहिती दिली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जमशेदपूर येथील २०१७च्या तुकडीचा सिव्हील इंजिनीअर असलेल्या कुमार याला प्रश्नपत्रिकांच्या पेट्या ठेवलेल्या कक्षात प्रवेश करण्याची परवानगी हक आणि आलम यांनी दिल्याचे यात म्हटले आहे.
आतापर्यंत ४९ जण अटकेत-
सीबीआयने या प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि पेपर सोडवणाऱ्यांसह ४९ जणांना आतापर्यंत अटक केली असून, आतापर्यंतच्या तीन आरोपपत्रांमध्ये ४० जणांचे नाव नमूद केले आहे.
नीट युजी पेपरफुटी प्रकरणातील चौकशी दरम्यान रोज नवी माहिती समोर येत आहे. जसजसा तपास सुरू आहे तसतसे पेपरफुटीचे धागेदोरे जुळत आहेत. NEET UG गैरव्यवहार प्रकरणी एटीएसच्या पथकाने लातूरमधून संजय जाधव आणि जलील पठाण या दोन शिक्षकांना रविवारी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. मात्र, आता त्याच दोन शिक्षकांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नीट परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.