मुलींच्या मोफत शिक्षणातील अडचणी दूर कधी होणार…?
Fee concession for girls in Maharashtra 2024 : या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबतच वैद्यकीय शिक्षण विभाग आपल्या परीने प्रसार-प्रचार करीत आहेत. मात्र, निर्णयाबाबत सविस्तर माहिती मुलींना नसल्याने, त्यांना १०० टक्के शुल्क सवलत मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यासोबतच कॉलेजचे प्राचार्य आणि संचालकांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका आणि प्रश्न उपस्थित केले आहे.या सर्वांची उत्तरे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ‘पुणे सुपरफास्ट’च्या व्यासपीठावर देणार आहेत
मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी होताना विद्यार्थिनींना अडचणी येत आहेत; तसेच, प्राचार्य, संचालक, कुलगुरू यांनाही याबाबत काही प्रश्न पडले आहेत. या अडचणींचे, तसेच प्रश्नांचे निरसन करण्यासाठी ‘मटा’च्या व्यासपीठावर पाटील येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण ३७ टक्क्यांहून ५० टक्क्यांपर्यत न्यायचे आहे. त्याला बळ देण्यासाठी राज्य सरकारने पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्कात; तसेच परीक्षा शुल्कात १०० टक्के शुल्क सवलत घेण्याचा निर्णय २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबतच वैद्यकीय शिक्षण विभाग आपल्या परीने प्रसार-प्रचार करीत आहेत. मात्र, निर्णयाबाबत सविस्तर माहिती मुलींना नसल्याने, त्यांना १०० टक्के शुल्क सवलत मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यासोबतच कॉलेजचे प्राचार्य आणि संचालकांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका आणि प्रश्न उपस्थित केले आहे.या सर्वांची उत्तरे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ‘पुणे सुपरफास्ट’च्या व्यासपीठावर देणार आहेत. या निमित्ताने पाटील यांच्याशी उपस्थितांना संवादही साधता येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थाचालक, कॉलेजांचे संचालक, प्राचार्य, अभ्यासक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.