Table of Contents
मित्रांनो, एक नवीन गुड न्यूज, ज्या उमेदवारांना प्रतिष्ठित संस्थेत करिअर सुरु करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC – ONGC Jobs 2025) मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. ONGC ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी ओनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, आणि अर्ज ongcindia.com या अधिकृत वेबसाइटवर करून उमेदवार सहभागी होऊ शकतात. या भरतीमुळे एकूण 50 पदे भरली जाणार असून, प्रत्येक पदासाठी 25-25 जागा राखीव ठेवण्यात आली आहेत. उमेदवारांना 18 डिसेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड स्क्रीनिंग आणि मुलाखतीच्या आधारावर होईल. आवश्यकतेनुसार मुलाखतीसाठी उमेदवारांना आमंत्रित केले जाऊ शकते, जी ऑनलाइन किंवा ऑफलाइन होऊ शकते. मुलाखतीला हजर राहण्यासाठी उमेदवारांना खर्च स्वतः उचलावा लागेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
ONGC मध्ये या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पात्रता आणि वयोमर्यादा तपासून त्या प्रमाणेच अर्ज करावेत.
अर्ज प्रक्रिया आणि अधिक माहिती:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना गुगल फॉर्म भरून अर्ज करावा लागेल. गुगल फॉर्म भरण्याची लिंक अधिकृत नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध असेल. ONGC सारख्या प्रतिष्ठित संस्थेत करिअर सुरू करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
अर्ज भरताना दिलेल्या सूचनांचा विचार करा:
अर्ज करताना, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या पात्रता आणि वयोमर्यादा तपासूनच अर्ज करावा. सर्व माहिती अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर एकदा तपासून घ्या.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE