नागपूर विद्यापीठाचा पुनर्मूल्यांकनाबाबत मोठा निर्णय!
RTMNU paper rechecking form : पुर्वीच्या अधिसभेच्या बैठकीत देखील या विषयावर चर्चा झाली होती, परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने अॅड. मनमोहन बाजपेयी यांनी मंगळवारच्या अधिसभेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. यावर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी संबंधित प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या प्रक्रियेत संलग्नित कॉलेजांमधील पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांचे बँक खात्यांचे तपशील मागवले जातील.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार, उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनानंतर जर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण मानले जात असेल, तर त्यांना भरण्यात आलेले पुनर्मूल्यांकन शुल्क परत केले जाईल. हा निर्णय हिवाळी २०२३ पासूनच्या परीक्षांतील विद्यार्थ्यांना लागू होईल, ज्यांनी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाले आहे. १० जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाईल.
विद्यापीठाने परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाच्या मान्यतेनंतर अधिकृतपणे या निर्णयाची घोषणा केली आहे. यासाठी, पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती संबंधित कॉलेजांकडून मागविली जाईल.
विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत प्रति विद्यार्थी प्रति पेपर ४५० रुपये शुल्क आकारले जाते. तथापि, पुनर्मूल्यांकनानंतर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास, त्यांच्याकडून आकारलेले शुल्क परत केले जाणार नाही. माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या कार्यकाळात ही मागणी केली गेली होती, परंतु आता अधिसभेच्या बैठकीत चर्चा आणि निर्णयानंतर १० जानेवारीपासून शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE