CAT कॅट निकाल जाहीर! ‘या’ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, सविस्तर माहिती एका क्लिकवर
CAT Result 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कलकत्ता (IIM Calcutta) ने CAT 2024 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आता iimcat.ac.in या वेबसाइटवर लॉग इन करून त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
यावर्षीच्या CAT निकालात एकूण १४ उमेदवारांनी १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्यात १ महिला आणि १३ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. यातील १ उमेदवार नॉन-इंजिनियर आहे, तर १३ इंजिनियर उमेदवार आहेत. सर्वाधिक १०० टक्के गुण मिळवणारे उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी १ उमेदवाराचा समावेश आहे.
यावर्षी २९ उमेदवारांनी ९९.९९ टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात २ महिला आणि २७ पुरुष आहेत. त्यातील २८ उमेदवार इंजिनियर असून १ उमेदवार नॉन-इंजिनियर आहे.
CAT 2024 च्या निकालात ३० उमेदवारांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात १ महिला आणि २९ पुरुष आहेत. पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेशमधील उमेदवारांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले आहेत.
CAT 2024 निकाल कसा तपासावा?
IIM CAT 2024 च्या अधिकृत वेबसाइटवर (iimcat.ac.in) जा.
होमपेजवर ‘कॅन्डिडेट लॉगिन’ वर क्लिक करा.
आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
आपले CAT 2024 स्कोअर स्क्रीनवर दिसतील.
स्कोअर काळजीपूर्वक तपासा आणि डाउनलोड करा.
CAT 2024 परीक्षा कधी झाली?
CAT 2024 परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतभरातील तीन सत्रांमध्ये घेण्यात आली. एकूण ३.२९ लाख नोंदणीकृत उमेदवारांपैकी २.९३ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली.
अधिक माहितीसाठी उमेदवार IIM CAT च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE