Today’s Gold Silver Rate 12th March 2025 : आज सोने आणि चांदी यात घसरण दिसून येत आहे . होळीपूर्वीच सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या सणाच्या अगोदरच महागाईचे दहन होऊन मौल्यवान धातू स्वस्त झाले. सध्या 18K, 22K, 24K सोन्याचे तसेच एक किलो चांदीचे भाव काय आहेत ते जाणून घ्या.
या आठवड्याच्या सुरूवातीस सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. मागील आठवड्यात सोन्यात चढउतारांचा सामना झाला होता, परंतु 10 मार्च रोजी सोन्याचा दर 110 रुपयांनी वाढला होता. मंगळवारी मात्र सोने 330 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळीही सोने स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, सध्या 22 कॅरेट सोने 80,035 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचे भाव देखील कमी झाले
गेल्या आठवड्यात चांदीने मोठ्या प्रमाणात महागाईचा सामना केला होता. मात्र या आठवड्याच्या सुरूवातीस चांदी किलोमागे 1100 रुपयांनी स्वस्त झाली. आज सकाळीही चांदीच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचे भाव
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 24 कॅरेट सोने 86,024 रुपये, 23 कॅरेट सोने 85,680 रुपये, 22 कॅरेट सोने 78,798 रुपये, 18 कॅरेट सोने 64,518 रुपये आणि 14 कॅरेट सोने 50,324 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलो चांदीचा भाव 96,626 रुपये झाला आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कोणताही कर किंवा शुल्क नसतो, परंतु सराफा बाजारात शुल्क आणि कर लागू होतात, त्यामुळे तिथे किंमतीत थोडा फरक दिसतो.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE