Central employees will get the 8th Pay Commission : देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या वेतनात मोठी वाढ मिळणार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होईल, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार वाढणार आहे. याआधी अहवाल होते की 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी होईल, परंतु अलीकडील माहितीनुसार काही विलंब होऊ शकतो. सरकारने अद्याप वेतन आयोगाच्या अंतिम अटी जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, 1 जानेवारी 2026 पासून आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की सरकारकडे पुरेसा वेळ आहे आणि आयोगाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होईल.
सरकारी निर्णयाची प्रतीक्षा आहे. आता आठव्या वेतन आयोगाच्या अंतिम अंमलबजावणीची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असल्याने सर्वांनाच याची उत्सुकता आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE