GATE 2025 Result Out :इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IIT Roorkee) ने १९ मार्च २०२५ रोजी अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) २०२५ चा निकाल जाहीर केला आहे. निकाल अधिकृत वेबसाइट https://gate2025.iitr.ac.in वर प्रकाशित करण्यात आले आहेत. परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी पोर्टलवर आवश्यक तपशील भरून निकाल पाहू शकतात.
आयआयटी रुरकीने १, २, १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी GATE परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षा ३० पेपर्ससाठी सीबीटी मोडमध्ये घेतल्या गेल्या. परीक्षा झाल्यानंतर, उत्तरपत्रिका आणि प्रतिसादपत्रिका २७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आल्या. त्यानंतर, उमेदवारांना २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ पर्यंत उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवण्याची संधी मिळाली होती. उमेदवार २८ मार्च २०२५ पासून त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील.
GATE २०२५ निकाल कसा तपासायचा?
सर्वप्रथम, gate2025.iitr.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आता, “निकलाशी संबंधित लिंक” या ऑप्शनवर क्लिक करा.
आपला नोंदणी आयडी/ईमेल आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
निकाल पहा आणि डाउनलोड करा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE