Samaj kalyan vibhag bharti : समाजकल्याण आयुक्तालयाने वर्ग-तीन संवर्गातील परीक्षेची उत्तरतालिका आज, सोमवार, २४ मार्चपासून उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या उत्तरतालिकेबाबत उमेदवारांना कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास ती २८ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजकल्याण आयुक्तालयाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ४ ते १९ मार्च दरम्यान वर्ग-तीन संवर्गातील विविध पदांसाठी परीक्षा आयोजित केली होती. या पदांमध्ये वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाजकल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक यांचा समावेश आहे.

उत्तरतालिका २४ मार्च रोजी दुपारी चार वाजता उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करणार असून, २८ मार्चपर्यंत ती पाहता येईल.
समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्पष्ट केले आहे की, “केवळ ऑनलाइन पद्धतीने नोंदवलेले आक्षेप आणि सूचना विचारात घेतल्या जातील. या संदर्भातील कोणताही पत्रव्यवहार लेखी किंवा ई-मेलद्वारे स्वीकारला जाणार नाही.”
आक्षेप नोंदवताना उमेदवारांना प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता असून, या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पूर्ण कराव्या लागतील.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati