JOIN Telegram
Monday , 31 March 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बँकेत नोकरीची संधी !! नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची भरती सुरु !

Nanded District Central Co-operative Bank Employee Recruitment Proposal Approved :नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बहुसंख्य संचालकांना मागील काही वर्षांपासून नोकरभरतीसाठी प्रतीक्षा करत होते. अलीकडे या बँकेला १५६ पदांची भरती करण्याची मान्यता मिळाली आहे; परंतु सहकार आयुक्तांनी घातलेल्या अटी व शासनाचे पूर्वीचे आदेश मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये सादर करण्यात आल्यावर बरेच संचालक नाउमेद झाले.

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी शिल्लक असून, याच शेवटच्या वर्षात नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी अनेक संचालक आग्रही होते. माजी अध्यक्ष व संचालक आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांमुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नोकरभरतीसंदर्भात बँकेचे अपील मंजूर करत, प्रस्तावित ३११ पदांपैकी ५० टक्के पदे भरण्यास ४ मार्च रोजी परवानगी दिली. त्यानंतर सहकार आयुक्तांनी १८ मार्च २०२५ च्या पत्रानुसार बँकेस १५६ पदे भरण्यास मान्यता देताना अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास संचालक मंडळ जबाबदार राहील, असे स्पष्ट केले.

Nanded District Bank Recruitment 2025

मार्च महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांतील वरील घडामोडींनंतर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये बँकेच्या प्रशासनाने विस्तृत टिपणांतून नोकरभरतीच्या प्रक्रियेसाठी घालण्यात आलेल्या अटी तसेच शासन व सहकार आयुक्तालयाचे विविध आदेश सादर केले. यामुळे बँकेच्या संचालकांना स्पष्ट करण्यात आले की, नोकरभरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी किंवा सगेसोयऱ्यांस वशिल्यातून बँकेच्या सेवेत घुसविण्याला वाव नाही.

सहकार आयुक्तांनी नांदेड बँकेला सरळ सेवाभरतीद्वारे १५६ पदे भरण्यास मंजुरी दिली असून त्यातील ७५ टक्के म्हणजेच १२० पदे लिपीक श्रेणीतील आहेत. बँकेच्या बहुसंख्य संचालकांना लिपीक पदावर आपले सगेसोयरे भरवण्यात स्वारस्य असल्याचे दिसून आले, परंतु मागील काळातील मनमानी पद्धतीने झालेल्या नोकरभरतीच्या तुलनेत आता या बँकेमध्ये पारदर्शक आणि नियमानुसार भरती प्रक्रिया होणार आहे, हे स्पष्ट झाले.

या बँकेत लिपिकांच्या १२० जागांव्यतिरिक्त, उपसरव्यवस्थापक-तांत्रिक (१ पद), उपव्यवस्थापक-तांत्रिक (७ पदे), बँकिंग ऑफिसर-श्रेणी १ (९ पदे) आणि श्रेणी २ (१९ पदे) अशा ३६ पदांची भरती करण्याला मान्यता देण्यात आली आहे. बँकेच्या मंगळवारी झालेल्या सभेमध्ये नोकरभरतीच्या प्रक्रियेवर बरीच चर्चा झाली. सहकार आयुक्तांनी दिलेल्या अटींचे पालन करून नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सहकार आयुक्तांनी घातलेल्या अटी:

वेगवेगळ्या श्रेणीतील मान्यता प्राप्त पदांखेरीज अन्य पदांची भरती केली जाऊ नये.

सरळसेवा भरतीबाबत नाबार्डने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचे तसेच राज्यशासनाच्या २०१८ व २०२२ च्या निर्णयांचे पालन करणे बँकेवर अनिवार्य राहील.

सहकार आयुक्तालयाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून संगणकीय ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेच्या सहाय्याने सरळसेवा भरती केली जाईल.

नोकरभरतीनंतर व्यवस्थापकीय खर्चाचे प्रमाण २ टक्क्यांपर्यंत तसेच सेवकांवरील खर्चाचे प्रमाण दीड टक्क्यांपर्यंत राहील, याची दक्षता घेतली जाईल.

सरळसेवा भरतीच्या विविध टप्प्यांवरील अहवाल विभागीय सह निबंधक कार्यालयामार्फत सहकार आयुक्तालयास वेळोवेळी सादर करण्यात येईल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *