Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) exam will be held in the months of May and June : टीएआयटी परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ या अधिकृत वेबसाइटवर पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेविषयी सविस्तर अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे परीक्षेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शिक्षक होण्याची इच्छाशक्ती असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एक परिपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे, त्यानुसार येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टीएआयटी परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाते. पात्र उमेदवारांना या परीक्षेची तयारी सुरू करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.
टीएआयटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच शिक्षक पदासाठी भरती केली जाते. यामध्ये, शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) पहिला आणि दुसरा पेपर उत्तीर्ण असलेले उमेदवार अनुक्रमे इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी निवडले जातात. तसेच, इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक नाही.
टीएआयटी परीक्षेच्या आयोजनाची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेविषयी सविस्तर अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शासकीय प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच सर्व खासगी शाळांमध्ये भरती होणार आहे. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात. वर्ष २०१७ नंतर, २०२२ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE