MPSC Clerk-Typist Exam : महाराष्ट्र गट क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ अंतर्गत ‘लिपिक-टंकलेखक’ संवर्ग नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली होती.
त्यानुसार, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२५ रोजी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम मागविण्यात आले होते. तथापि, अनेक उमेदवारांनी पसंतीक्रम सादर केलेले नाहीत. त्यामुळे, आयोगाने अशा उमेदवारांना शेवटची संधी देऊन नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करण्याची मुदतवाढ दिली आहे.
पसंतीक्रम सादर करण्याची शेवटची संधी २ एप्रिल, २०२५ रोजी १२.०० वाजेपासून सुरू होऊन ४ एप्रिल, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील. संबंधित उमेदवारांना यावेळी पसंतीक्रम सादर करणे अनिवार्य आहे. जर कोणताही उमेदवार दिलेल्या कालावधीत पसंतीक्रम सादर करत नाही, तर त्यांचा अंतिम निकाल विचारात घेतला जाणार नाही आणि त्यांना सदर भरती प्रक्रियेतून वगळण्यात येईल.
पसंतीक्रम सादर करण्याची कार्यपद्धती व इतर संबंधित बाबी दिनांक २१ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच राहतील. तांत्रिक अडचणींविषयी कोणतीही समस्या आल्यास, उमेदवार आयोगाच्या टोल-फ्री क्रमांक १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ वर संपर्क साधू शकतात किंवा support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर संपर्क करू शकतात.
आयोजित एमपीएससी परीक्षेच्या स्वरूपाबाबत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत वर्णनात्मक स्वरूप कायम राहील. २०२२ मध्ये हा निर्णय घेतला गेला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्यात येईल. त्यांनी हेही स्पष्ट केले की, यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेतली जाईल. विद्यार्थी यूपीएससीसाठी अधिक सक्षम होतील, अशी आशा आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE