BAMU Recruitment 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ वर्षांनंतर प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ७३ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये प्राध्यापकांच्या आठ, सहाय्यक प्राध्यापकांच्या १२ आणि सहायक प्राध्यापकांच्या ५३ पदांचा समावेश आहे. केंद्रीय शासनाने ‘समर्थ पोर्टल’ तयार केले असून, या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली असून, २ एप्रिल ते २ मे २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षकांच्या २८९ जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. वर्तमानात विद्यापीठात १३० शिक्षक कार्यरत आहेत, तर रिक्त असलेल्या १५९ जागांपैकी ७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. २०१९ मध्ये उच्च शिक्षण विभागाने राज्य शासनाकडून या पदांच्या भरतीसाठी मान्यता दिली होती, पण २०२३ मध्ये ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाकडे परवाणगीसाठी वारंवार पाठपुरावा केला. अखेरीस मार्च २०२५ मध्ये या पदभरतीसाठी मान्यता मिळाली.
पूर्वीच्या भरती प्रक्रियेत, २०२३ मध्ये प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते, ज्यात सुमारे ५८१५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यामध्ये ४ हजार ६०० हॉर्डकॉपी जमा झाल्या होत्या. मात्र, व्यवस्थापन परिषदेने ती भरती प्रक्रिया रद्द केली आणि सर्व अर्ज बाद ठरवले. यामुळे अर्जदारांचे शुल्कही वाया गेले. जुने अर्ज आता स्वीकारले जाणार नाहीत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाईन अर्जाची प्रत आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी ९ मे २०२५ रोजी कार्यालयीन वेळेत आस्थापना विभागात दाखल करावी लागेल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE