IGNOU Recruitment 2025 : सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (IGNOU) एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स डिव्हिजनमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीत कन्सल्टंट, सीनियर कन्सल्टंट आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट या पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी केवळ एकच जागा रिक्त असून, इच्छुक उमेदवारांनी २० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा.
पात्रता निकषानुसार, कन्सल्टंट पदासाठी उमेदवाराकडे सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल शाखेतील B.E./B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. सीनियर कन्सल्टंट (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह) आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असून, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएटसाठी इंग्रजी टायपिंगचा कोर्स आणि MS Office चे ज्ञान असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹60,000 पर्यंत पगार दिला जाणार आहे.
सीनियर कन्सल्टंट पदासाठी अर्ज acdadmin@ignou.ac.in या ई-मेलवर पाठवायचा आहे, तर कन्सल्टंट पदासाठी अर्जाचा फॉर्म भरून तो IGNOU च्या दिल्लीतील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागेल.
भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि अर्ज फॉर्मसाठी IGNOU च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE