IDBI बँक भरती 2025: कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) ग्रेड ‘O’ पदांसाठी संधी ! IDBI बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (Junior Assistant Manager – JAM), ग्रेड ‘O’ या पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत देशभरात एकूण ६७६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ८ मे २०२५ पासून सुरू होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार २० मे २०२५ पर्यंत IDBI बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करू शकतात.
निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होणार आहे — ऑनलाइन चाचणी (OT), कागदपत्र पडताळणी (DV), वैयक्तिक मुलाखत (PI) आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (PRMT). ऑनलाइन परीक्षा ८ जून २०२५ रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित केली जाईल.
उमेदवारांनी AICTE, UGC किंवा इतर सरकार मान्यताप्राप्त संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी किमान ६०% गुण, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी किमान ५५% गुण आवश्यक आहेत. केवळ डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेले उमेदवार पात्र मानले जाणार नाहीत. तसेच, उमेदवारांना संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
या भरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात, पात्रतेचे निकष, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती IDBI बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE