मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक (Maratha Vidya Prasarak Samaj Nashik) अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदासह (Assistant Teacher Post) विविध ४८८ रिक्त जागा (488 vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख २६ मे २०२५ आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या अधिकृत वेबसाइट mvp.edu.in ला भेट द्या. उमेदवारांना मराठा विद्या प्रसारक समाज मध्यवर्ती कार्यालय, शिवाजी नगर, गंगापूर रोड नाशिक येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असा भरा ऑनलाईन पद्धतीने अर्ज
सर्वप्रथम विद्या प्रसारक समाज नाशिकच्या अधिकृत वेबसाइट https://mvp.edu.in/mvpsite ला भेट द्या. तिथे भरती संबंधित जाहिरात शोधा. ॲपलाय बटणावर क्लिक करा. आवश्यक माहिती भरा. अर्ज शुल्क भरा (जर लागू असेल तर). अर्ज सबमिट करा. भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यांची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE