दहावीचा निकाल उद्या मंगळवारी दि.13 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
दहावीचा निकाल येत्या मंगळवारी (दि.13) मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.त्यामुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना अवघे काही तास वाट पहावी लागणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2025 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली.दरवर्षापेक्षा सुमारे 10 दिवस आधी परीक्षेचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. येत्या 15 मे पूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळातर्फे कळविण्यात आली आहे.
अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत.
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE