वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महत्वाचे! – एसटीत महामंडळात नोकरभरती लवकरच सुरु होणार, ठराव मंजूर; परिवहन मंत्र्यांकडून घोषणा!

मित्रांनो एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया मागिल बऱ्याच वर्षांपासून रखडले आहे. अनेक उमेदवार या भरतीची प्रतीक्षा बघत आहे. यातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी मिळाली आहे. आर्थिक स्थितीमुळे मुंबई उच्च न्यायालयाने भरतीला 2024 पर्यंत मनाई केली होती. तोट्यात असलेले एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भविष्यात तब्बल 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी चालक, वाहकांसह इतर वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासणार आहे. ही पदे भऱण्यासाठी लवकर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.  चला या बद्दल पूर्ण माहिती बघूया!

ST Mahamandal Bharti 2025

एसटी महामंडळाच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी मिळाली आहे. आर्थिक स्थितीमुळे मुंबी उच्च न्यायालयाने भरतीला 2024 पर्यंत मनाई केली होती. पण आता पुढील काही वर्षांमध्ये निवृत्त होणारे कर्मचारी, नव्या बसेस यासाठी भरती करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. याबाबतचा मंजूर झालेला प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. वाढत्या बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले. भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार असल्याची माहितीही प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

भरतीच्या अनुषंगाने सरनाईक यांनी एसटीच्या प्रत्येक विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन भरतीबाब एकत्रित मागणी सादर करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला पुढील काही दिवस लागणार आहेत. त्याला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मंत्र्यांनी त्यासाठी नेमका किती कालावधी लागणार याबाबत माहिती दिलेली नाही. दरम्यान, एसटीचे अपघात रोखण्यासाठ एसटी महामंडळाकडून दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. वर्षातील 260 दिवस विना अपघात सेवा बजवणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबरच पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे, वीस वर्षे विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार केली जाणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About MahaBharti MP Jobs

Check Also

Ulhasnagar Mahanagarpalika Corporation अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Ulhasnagar Mahgarpalika Corporation Bharti 2025– UMC can release a vacancies on various posts. If intrested then check eligibility criterea and apply.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *