CBSE बोर्डाने दहावीचा निकाल आज १ ३ मे २०२५ ला जाहीर केला आहे. विद्यार्थी आपला निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन बघू शकता . निकाल कसा डाउनलोड करायचा त्या बद्दल माहिती जाणून घ्या .
२६ हजार ६७५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण २३ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी २२ लाख २१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाचा निकाल ९३.६६ टक्के लागला आहे. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक ९९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल सीबीएसईच्या वेबसाईटवर पाहता येईल. तसेच, डिजिलॉकरवर मार्कशीट डाउनलोड करता येईल.
सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ते आता निकाल पाहू शकतात. परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली. 13 मे रोजी बोर्डाने निकाल जाहीर केला. यंदा 93.66 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक विद्यार्थी पास झाले आहेत.
सीबीएसई बोर्डाने बारावीच्या पाठोपाठ आता दहावीचा निकालही जाहीर केला आहे. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून निकालाची वाट पाहिली, त्यांना आज निकाल पाहता आला. सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या काळात झाली. आज 13 मे रोजी सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लागला आहे.
यंदा 26 हजार 675 शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यासाठी 7 हजार 837 परीक्षा केंद्र होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढली होती. दहावीच्या परीक्षेसाठी 23 लाख 85 हजार 79 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23 लाख 71 हजार 939 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 22 लाख 21 हजार 636 विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 93.66 टक्के लागला आहे.
सीबीएसई बोर्डाचा निकाल 2025 कसा पाहायचा?
सीबीएसईचा निकाल 2025 कसा तपासायचा, यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत.
1. CBSE च्या वेबसाईट cbse.gov.in वर जा.
2. ‘Results’ या टॅबवर क्लिक करा.
3. Class 10 सिलेक्ट करा.
4. तुमचा रोल नंबर, शाळेचा नंबर, ऍडमिट कार्ड आयडी आणि जन्मतारीख टाका.
5. ‘Submit’ वर क्लिक करा.
6. निकाल डाउनलोड करा..
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE