महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2024 (MPSC Civil Engineering Services Preliminary Exam 2024) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य म्हणून 15,000 रुपये दिले जाणार आहेत.
या योजनेसाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने 8 एप्रिल 2025 रोजी जाहीर झालेली स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवारांना अर्ज ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज उमेदवाराने दिलेल्या गुगल फॉर्म लिंकवर जाऊन 18 मे 2025 पूर्वी भरावा. अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अचूकपणे भरावी. चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
एकाच उमेदवाराने वेगवेगळी माहिती देऊन एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास देखील त्याची उमेदवारी रद्द होईल. ऑफलाइन अर्जासाठी जाहिरातीत दिलेला मुद्रित अर्ज अचूकपणे भरून, आवश्यक कागदपत्रांसह साक्षांकित छायांकित प्रती 20 मे 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत पोस्ट किंवा कुरिअरद्वारे बार्टी, पुणे कार्यालयात पाठवावा. पाकिटावर “MPSC स्थापत्य अभियांत्रिकी 2024 मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य” असे स्पष्टपणे नमूद करावे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे म्हणजे जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी दाखला किंवा डोमिसाईल प्रमाणपत्र, MPSC स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र, आधार कार्ड आणि अर्जदाराच्या नावाने असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पालक, नातेवाईक किंवा इतर कोणीही यांचे बँक खाते चालणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही प्रकारचे अर्ज (ऑनलाईन आणि ऑफलाइन) करणे अत्यावश्यक आहे. केवळ एकच अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी स्पष्ट केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE