आदीवासी विकास विभाग मार्फत विविध पदाच्या ६११ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती . ही परीक्षा ९ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान घेण्यात आली होती . आता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . उमेदवारांनी आपला निकाल अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करून तपासून घ्यावा . वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागामार्फत विविध पदांसाठी राबविण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत विभागाने 17 पदनामांकरिता एकूण 611 रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा जाहिरात 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केली होती. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, 9 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली आणि आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेमध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, मुख्य लिपिक, संशोधक सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वरिष्ठ लिपिक, वॉर्डन आणि अधीक्षक अशा विविध पदांचा समावेश होता. भरती प्रक्रियेची सुरुवात 9 एप्रिल रोजी वॉर्डन व अधीक्षक पदाच्या परीक्षेने झाली होती, तर 25 एप्रिल रोजी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या परीक्षेने अखेर घेतली गेली.
विशेषतः गृहपाल (स्त्री) पदासाठी IBPS मार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती विभागांकरिता किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://tribal.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपला निकाल तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकेतस्थळावर विभागनिहाय आणि जिल्हानिहाय गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आली असून, पात्र उमेदवारांच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया लवकरच जाहीर होणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE