१०वी आणि १२वी महाराष्ट्र राज्य बोर्ड चा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आला होता. त्यात काही विद्यार्थी कुठल्या विषयात अनुत्तीर्ण झाले होते. त्यासाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येते . दरवर्षी ही परीक्षा जुलै – ऑगस्ट मध्ये घेण्यात येते . पण यावर्षी ही परीक्षा जून – जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. त्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांनी ते खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करून सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०वी (SSC) आणि १२वी (HSC) च्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahahsscboard.in/mr प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या या पुरवणी परीक्षा यंदा थोड्या लवकर घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी किंवा अनुत्तीर्ण विषय उत्तीर्ण करण्याची संधी यामधून दिली जाणार आहे. बारावीचा निकाल ५ मे, तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
राज्य मंडळाने हे देखील स्पष्ट केले आहे की, परीक्षा सुरू होण्याआधी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडून देण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम आणि अधिकृत असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तेच वेळापत्रक ग्राह्य धरावे आणि त्यानुसार परीक्षेला हजर राहावे. तसेच, इतर संकेतस्थळांवरील किंवा माध्यमांतील वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असा सल्लाही मंडळाने दिला आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE