वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

एनडीएत ! श्रीती दक्ष कला शाखेत अव्वल

भारतीय सशस्त्र दलासाठी आणि विशेषतः महिलांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून १७ महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीने पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्यासह ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स देखील एनडीएतून पदवीधर झाले आहेत.

या सर्व महिला कॅडेट्स आता भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात (Indian Army, Navy, and Air Force) अधिकारी म्हणून सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, महिला कॅडेट्समध्ये श्रीती दक्ष हिने कला शाखेत सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

At NDA, Shriti Daksh is topper

सन २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांना एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०२२ मध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीचा एनडीएमध्ये प्रवेश झाला. पुण्यातील खडकवासला येथील एनडीए कॅम्पसमध्ये पार पडलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये या महिला आणि पुरुष कॅडेट्सनी सहभागी होत पदवी मिळवली. या सोहळ्याला पालक, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि खास पाहुणे उपस्थित होते. १७ महिला कॅडेट्सपैकी ९ लष्करात, ३ नौदलात, तर ५ हवाई दलात नियुक्त होतील.

दरम्यान, मार्च २०२५ मध्ये संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी संसदेत माहिती दिली की २०२२ मध्ये महिलांच्या पहिल्या तुकडीच्या प्रवेशानंतर आजपर्यंत १२६ महिलांना एनडीएमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी १२१ महिला सध्या प्रशिक्षण घेत आहेत, तर ५ कॅडेट्सनी प्रशिक्षण अर्धवट सोडले आहे.

ही १२१ महिला कॅडेट्स देशातील १७ राज्यांमधून आलेल्या आहेत. त्यात हरियाणामधून सर्वाधिक ३५ महिला, उत्तर प्रदेशातून २८, राजस्थानातून १३, महाराष्ट्रातून ११, तर दक्षिण भारतातील केरळमधून ४ आणि कर्नाटकमधून १ कॅडेट सहभागी झाली आहे. अकादमी सोडलेल्या ५ कॅडेट्स हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आहेत.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GMC रत्नागिरी – प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ भरतींसाठी अर्जाची सूचना

GMC Ratnagiri Teaching Recruitment 2025 - Dean, Government Medical College, Ratnagiri invites Offline applications in prescribed....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *