ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत (Directorate of Vocational Education and Training – DVET) ITI प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सदर प्रवेश प्रक्रिया १५ मे २०२५ पासून पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी खालील प्रक्रिया २७ जूनच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे:

प्रवेश अर्ज सादर करणे
अर्जाची खातरजमा करणे
पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्यक्रम निवडणे
मदत सेवांची सुविधाही सुरू
विद्यार्थ्यांसाठी ६ जूनपासून चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. तथापि, मुंबई विभागातील हेल्पलाइन क्रमांक शुक्रवारी काही वेळासाठी बंद होता, अशी नोंद घेण्यात आली आहे. चॅटबॉटसह, DVET मार्फत प्रत्येक विभागासाठी विशिष्ट मदत क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सध्याचा प्रवेश आकडा
DVET कडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण विद्यार्थी नोंदणी १,३९,०३२ इतकी झाली असून, यापैकी:
१,२७,४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत
१,२५,००५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे
७८,४०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत
पर्यायी अर्ज भरलेले विद्यार्थी: ६८,५८३
अधिक माहितीसाठी
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati