मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; सारथी संस्थेची कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुरू मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजघटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून खास प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश या समाजातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

प्रशिक्षणासाठी निधी मंजूर सारथी संस्थेने प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास सोसायटीला आर्थिक मदतही जाहीर केली असून, प्रशिक्षणाचा कालावधी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे निधी दिला जाणार आहे:
८वी ते १०वी उत्तीर्ण: १६ दिवसांचे प्रशिक्षण – ₹१२,६१२ ११वी उत्तीर्ण: १३ दिवसांचे प्रशिक्षण – ₹७,६४२ १२वी उत्तीर्ण: ११ दिवसांचे प्रशिक्षण – ₹७,४८४ मार्च २०२४ मध्ये या प्रशिक्षणासाठी मुंबईतील ९ संस्थांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या माध्यमातून ५०० उमेदवारांचे प्रशिक्षण घेण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
पात्रतेचे निकष: वय: १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे शिक्षण: ८वी ते १२वी पास, तसेच ITI, डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवार मराठा, कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा समाजातून असावा आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक प्रशिक्षण कसे व कुठे होणार?
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे नोंदणीकृत संस्थांमार्फत जिल्हा स्तरावरील शासकीय आयटीआय व तंत्रनिकेतनांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे अर्ज प्रक्रिया उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा किंवा संबंधित प्रशिक्षण संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊनही अर्ज करता येईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

