वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० पदांसाठी नवीन भरती !

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० विविध रिक्त  पदांच्या नवीन भरती ची जाहिरात आजच प्रकाशित झालेली आहे. त्या साठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट ‘क’ आणि ‘ड ‘ च्या ४९० जागांसाठी भरती होणार असून ,  अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५  आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १० जून पासून KDMC च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि अर्ज वेळेत सादर करावा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

प्रशासकीय , वैद्यकीय , लेखा , अभियांत्रीकी ,अग्निशमन , विधी , क्रीडा आणि उद्यान सेवा यासारख्या  विविध क्षेत्रातील पदांसाठी ही भरती आहे.

Kalyan Dombivli Muncipal Corporation Bharti 2025

या भरतीमध्ये विविध प्रकारची पदे आहेत. जसे की प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी. भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीनुसार, गट ‘क’ आणि ‘ड’ मधील एकूण ४९० पदांसाठी अर्ज करायचा आहे. या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम पुढे दिलेला आहे. ‘कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२५ अभ्यासक्रम’ या पीडीएफमध्ये सर्व अभ्यासक्रम आहे.

अर्ज करण्याची तारीख १० जून २०२५ ते ३ जुलै २०२५ पर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक गोष्टी जाहिरातीत दिलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३ जुलै २०२५ रोजी रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. KDMC च्या वेबसाइटवर (www.kdmc.gov.in) अर्ज उपलब्ध आहे.

परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या ७ दिवस आधी मिळतील. परीक्षेची तारीख KDMC च्या वेबसाइटवर दिली जाईल. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस.एम.एस.व्दारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्दीस देऊन माहिती कळविण्यात येईल.

त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेत स्थळास भेट देणे आवश्यक राहील.” पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव कमी केला जाणार नाही. वरील सर्व पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे लागेल. उमेदवारांची निवड फक्त गुणांच्या आधारावर होईल. गुणवत्ता यादीत येण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% गुण आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांच्या गुणांची यादी KDMC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

तसेच , भरतीच्या अधिक माहिती साठी आमच्या majhinaukri.net.in या वेबसाईट ला रोज भेट द्या आणि आमच्या whatsapp Channel ला follow करा.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SVKM Institute of Pharmacy अंतर्गत विविध पदांची भरती सुरु !

SVKM Institute of Pharmacy Recruitment 2025 SVKM Institute of Pharmacy Job Recruitment 2025 – SVKM …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *