देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याचे पैसे २० जून ला सरळ खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. देशभऱ्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे. हा हफ्ता कधी जमा होणार याची सविस्तर माहिती जाणून घ्या. अधिक माहिती खाली दिलेली आहे.
ही देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मोदी सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी वर्षाला ६००० रुपयांची मदत केली जाते. या योजनेचे १९ हफ्ते शेतकऱ्यांना देऊन झाले आहेत. आता त्यांना २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

पंतप्रधान मोदी यांनी १९ वा हफ्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहार दौऱ्यात असताना जारी केला होता. हा हफ्ता मिळून ४ महिने होत आले आहेत. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेच्या २० वा हफ्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे.
पंतप्रधान किसान योजनेचा 20 वा हप्ता शुक्रवारी 20 जून रोजी जारी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी या हप्त्याची तारीख जाहीर केली जाणार आहेत आणि त्यानंतर हप्ता जमा होणार आहे.
केंद्र सरकार देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता आगामी काळात 20 हप्ताही जारी केला जाणार आहे
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. मात्र या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ओटीपी आधारित ईकेवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत.
पीएम किसान यादीत नाव कसे तपासायचे?
- सर्वप्रथम पीएम किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर ‘लाभार्थी यादी’ लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि गेट रिपोर्ट वर क्लिक करा.
- सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati