नवीन अपडेट ; लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता देण्यात आला. त्यांना ३० जून २०२५ पासून जून महिन्याचा हफ्ता दिला जातोय आणि जुलै महिन्याचा हफ्ता कधी पर्यंत मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योनजेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक बातमी समोर आली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि ही योजना २०२४ पासून सुरु झालेली आहे. २०२४ यावर्षी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आता पर्यंत महिलांना या योजनेअंतर्गत १२ हफ्ते मिळाले .
आता सध्या माझी लाडकी बहीण योजनेचा १२ वा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होतोय. ३० जून २०२५ पासून या योजनेचा १२ वा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. आणि आता महिला जून महिन्याचा हफ्ता जुलै महिन्यात मिळाला असल्याने जुलै महिन्याचा लाभ कधीपर्यंत मिळणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार ? लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते मिळाले आहेत. खरे तर जून महिन्याच्या हप्ता सोबत जुलै महिन्याचा हप्ता दिला जाईल अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. शिवाय जून महिन्याचा हप्ता जून मध्ये मिळाला नाही यामुळे जुलै महिन्यात जुन आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना सुद्धा होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.
सरकारकडून यावेळी फक्त जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून 3600 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना कालपासून फक्त जून महिन्याचे पैसे दिले जात आहेत. पण लाडक्या बहिणींनी चिंता करण्याचे कारण नाही कारण की, जुलै महिन्याचे पैसे जुलै महिन्यातच मिळतील अशी बातमी समोर आली आहे.
जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार याची अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेले नाही पण या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा हप्ता जमा केला जाईल असे दिसते.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE